जय किसान मंडळातर्फे कोरोना लसीकरणासह विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:02+5:302021-09-13T04:32:02+5:30
गणेशोत्सव हा समाजाच्या हिताचे उपक्रम राबवत साजरा करण्याची परंपरा धारूर गतवर्षी गणेश मंडळाने आयोजित केलेल्या शिबिरात १००८ ...
गणेशोत्सव हा समाजाच्या हिताचे उपक्रम राबवत साजरा करण्याची परंपरा धारूर गतवर्षी गणेश मंडळाने आयोजित केलेल्या शिबिरात १००८ पशुधनाची तपासणी व उपचार करण्यात आले होते. तसेच शहरातील विद्यार्थी, युवक यासाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा , वृक्षारोपण जनजागृती फेरी , वृक्ष वाटप , सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले होते. जलबचतीसाठी जन जनजागृती कार्यक्रम व सामाजिक सलोखा जपण्यासाठीचे उपक्रम मंडळाने राबविले होते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण, रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा लक्षात घेत रक्तदान शिबिर, पशुधन आरोग्य शिबिर, ऑनलाइन वकृत्व स्पर्धा, डेंग्यू, हिवताप, मलेरियाबाबत जनजागृती फेरी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील धनवडे, उपाध्यक्ष मयूर बहिरे, सदस्य सूरज तिबोले, मय्यानंद उकंडे , ऋषीकेष गव्हाणे , गणेश गिरी , राहुल कठाळे , ज्ञानेश्वर पांचाळ , मनोज जगताप ,सागर ढाने,ईश्वर खामकर,अमोल जगताप , प्रदीप जाधव आदी परिश्रम घेत आहेत.
120921\img-20210911-wa0108.jpg
पशुधनातपानी शिबीर जयकिसान गणेश मंडळ