वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:19+5:302021-01-24T04:16:19+5:30
पिकांवर कीड बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रब्बी पिके बहरू लागली आहेत, परंतु या पिकांना थंडी आवश्यक असताना ...
पिकांवर कीड
बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रब्बी पिके बहरू लागली आहेत, परंतु या पिकांना थंडी आवश्यक असताना थंडी ओसरली असल्याने परिणामी पिकांवर कीड दिसत आहे.
रस्त्यांवर खड्डे वाढले
धारूर : धारूर ते आसरडोह या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. या रस्त्याचे अंतर कापण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे लागत आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
भाजीचे भाव घसरले
अंबाजोगाई : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने भाजी दरांमध्ये घसरण झाली आहे. टोमॅटो, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, पालेभाज्या, फळभाज्यांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
वीज दिवसा द्या
शिरूर कासार : रब्बी हंगामातील पिकांना पूर्ण दाबाने दिवसाच वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बिबट्याची भीती अजून गेलेली नाही. महावितरणने दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. तसेच किराणा सामानातील वस्तूंचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईची मोठ झळ सहन करावी लागत आहे. अचानकच सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा भरला होता. यावर्षी मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या. या सर्व घटनांचे पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. तरीही अद्याप शासनाकडून पीकविम्याचे वाटप करण्यात आलेले नाही. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान समोर ठेवून खरीप हंगामातील पीक विमा लागू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.