गोळेगांव नदीत बैलासह गाडी वाहून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:42+5:302021-09-08T04:40:42+5:30
गेवराई : शेतात चारा आरण्यासाठी जाणारा शेतकरी बैलगाडीसह नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जातेगांव ...
गेवराई : शेतात चारा आरण्यासाठी जाणारा शेतकरी बैलगाडीसह नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जातेगांव सर्कलमधील गोळेगांव येथे घडली. दरम्यान शेतकऱ्याची ओरड एकून मदतीसाठी धावलेल्या युवकांनी शेतकरी व एका बैलाला वाचविण्यात यश मिळविले तर दुसऱ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी, नाल्या, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील जातेगांव जवळच्या गोळेगाव येथील शेतकरी विठ्ठल सखाराम काळे हे मंगळवारी दुपारी बैलासाठी खाद्य आणण्यासाठी घरून शेतात बैलगाडीने जात होते. गावाजवळील नदीत अचानक पाण्याचा वेग वाढल्यामुळे बैलगाडीसह शेतकरी वाहून जात होते. त्यावेळी शेतकऱ्याची ओरड ऐकून काही युवकांनी धाव घेत शेतकरी व एका बैलाचे प्राण वाचविले. तर एकाचा मृत्यू झाला. तसेच गाडी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी नदीपात्रातून धोकादायक प्रवास करू नये असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी लोकमतशी बोलताना केले आहे.
070921\sakharam shinde_img-20210907-wa0060_14.jpg