‘एआरटीओ’त ‘दक्षता’ची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:17 AM2018-10-25T00:17:29+5:302018-10-25T00:18:27+5:30

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (एआरटीओ) तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत गेल्या. याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाच्या ‘दक्षता’ पथकाने बुधवारी दुपारी अचानक धाड टाकून आठ दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महत्वाचे कागदपत्रेही हस्तगत करण्यात आलेले आहेत. या धाडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

'Vertical Weapon' in 'ARTO' | ‘एआरटीओ’त ‘दक्षता’ची धाड

‘एआरटीओ’त ‘दक्षता’ची धाड

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडील तक्रारींची दखल : महत्त्वाच्या कागदपत्रांसह बीडमध्ये आठ दलाल जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (एआरटीओ) तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत गेल्या. याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाच्या ‘दक्षता’ पथकाने बुधवारी दुपारी अचानक धाड टाकून आठ दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महत्वाचे कागदपत्रेही हस्तगत करण्यात आलेले आहेत. या धाडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीडच्या एआरटीओ कार्यालयात मागील काही महिन्यांपासून ढिसाळ कारभार सुरू आहे. अधिकाऱ्यांपेक्षा येथे दलालांचेच राज्य असल्याचे वारंवार समोर आले आहे. येथील अधिकारीही या सर्व गैरप्रकारांकडे डोळेझाक करीत असल्याचे घडलेल्या घटनांवरून समोर आले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालल्याने काही नागरिकांनी या कार्यालयाच्या आणि कार्यालयात सुरू असलेल्या गैरप्रकारांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परिवहन आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी परिवहन विभागाचे दक्षता पथक बीडमध्ये धडकले. अचानक कार्यालयात धाड टाकून तब्बल आठ दलालांना महत्वाच्या कागदपत्रांसह ताब्यात घेतले.
अचानक पडलेल्या धाडीमुळे कोणालाच तेथून पळ काढणे अशक्य होते. त्यामुळे ते जाळ्यात अडकले. ही धावपळ पाहून बाकीचे दलाल सावध झाले आणि आपले बस्तान तेथेच सोडून त्यांनी पलायन केले.
जे दलाल कार्यालयात अनाधिकृतपणे घुसून गैरप्रकार करीत होते, तेच दलाल यामध्ये अडकल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाई करणाºया पथकात सहायक पोलीस आयुक्त (दक्षता) प्रशांत कोलवाडकर, आर.जी.घरसी, रावसाहेब वाघ यांच्यासह आठ लोकांचा सहभाग होता.
वाहन निरीक्षकांची झाली धावपळ
कार्यालयातील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्याचे समजताच वाहन तपासणीच्या नावाखाली ‘वसुली’ करणाºया वाहन निरीक्षकांची पाचावर बसली. त्यांनी तात्काळ कार्यालयात धाव घेतली. परंतु तोपर्यंत सर्व दलालांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले होते. या वाहन निरीक्षकांनी मग ठाणे गाठून दक्षता विभागाला माहिती दिली. माहिती देतानाही त्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.
यापूर्वी मुंबई क्राईम ब्रांचची धाड
साधारण महिन्यापूर्वीच मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या पथकाने या कार्यालयात धाड टाकली होती. यामध्ये एका दलालाला ताब्यात घेण्यात आले होते. सध्याही हा दलाल क्राईम ब्रांचच्या ताब्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता मंगळवारी पडलेल्या अचानक धाडीमुळे कार्यालयातील गलथान कारभार व अधिकाºयांचे होत असलेले दुर्लक्ष समोर आले आहे.
वाहन निरीक्षकांचे कानावर हात
या कारवाईदरम्यान, मोटार वाहन निरीक्षक सुशांत जाधव व सहायक वाहन मोटार निरीक्षक क्षीतिज व्यवहारे हे दोघेही बीड ग्रामीण ठाण्यात होते.
दक्षताला माहिती देताना त्यांची चांगलीच धावपळ होत असल्याने ते घामाघुम झाल्याचे दिसले. माध्यमांनी विचारलेल्या एकाही प्रश्नांवर त्यांना उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी एआरटीओ यांना विचारा, असे म्हणून कानावर हात ठेवले.
एवढी मोठी कारवाई झालेली असताना निरीक्षकांना काहीच माहिती नसणे, हे आश्चर्य वाटणारे आहे.

Web Title: 'Vertical Weapon' in 'ARTO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.