शेवटच्या दिवशीही जोरदार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:05 AM2019-10-05T00:05:26+5:302019-10-05T00:06:23+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदार संघात २३२ उमेदवारांनी ३१७ उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
बीड : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदार संघात २३२ उमेदवारांनी ३१७ उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तर अपक्ष उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल केले. ५ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
सर्वच सहा मतदार संघातून कोण- कोण अर्ज भरणार याबद्दल उत्सुकता होती. बीडमधून राष्टÑवादी कॉँग्रेसचे संदीप क्षीरसागर, एमआयएमचे शेख शफीक, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक हिंगे, माजलगावातून भाजपचे रमेश आडसकर, परळीतून अपक्ष व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने राजश्री मुंडे यांच्यासह १५२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
बीड : विधानसभा मतदार संघातून एकूण ५४ उमेदवारांनी ७१ अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे संदीप क्षीरसागर, एमआयएमचे शेख शफीक, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे, अपक्ष राजेंद्र मस्के, अॅड. शेख बख्शू तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
आष्टी : विधानसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे भिमराव धोंडे, राकॉँचे बाळासाहेब आजबे, वंचित बहुजन आघाडीचे नामदेव सानप, साहेबराव दरेकर, सतीश शिंदे, जयदत्त धस, साहेबराव थोरवे, रविंद्र ढोबळे, अमोल तरटे, रामदास खाडे, विष्णू गाडेकर, संजय खांडेकरसह २८ उमेदवारांनी अर्ज भरले.
परळी : विधानसभा मतदार संघात एकूण ४१ उमेदवारांनी ५३ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, रोहिदास तात्यासाहेब देशमुख, भिमराव सातपुते, लिंबाजी अंबाजी मुंडे सह इतर उमेदवारांचा समावेश आहे.
अंबाजोगाई :अनुचित जातीसाठी आरक्षित केज विधानसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या नमिता मुंदडा, राष्टÑवादी कॉँग्रेसचे पृथ्वीराज साठे, जयश्री साठे, वंचित बहुजन आघाडीचे वैभव स्वामी, तसेच विलास काळुंके, राहुल मस्के, श्रीधर जाधव, बाळकृष्ण हंकारे, डॉ जितेंद्र ओव्हाळ, गयाबाई धिमधिमे ,लहू बनसोडे, माणिक गायकवाड, परमेश्वर उदार, निलेश आरके, मधुकर काळे, शिवाजी सावळकर आदींचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.
माजलगाव : मतदार संघात भाजपचे रमेश आडसकर यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्टÑवादीचे प्रकाश सोळंके, शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे, स्वाभिमानीचे अशोक नरवडेसह एकूण ६४ उमेदवारांनी ९१ अर्ज दाखल केले.
गेवराई:विधानसभा मतदारसंघात एकूण २९ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले. अपक्ष बदामराव पंडित, राष्टÑवादी कॉँग्रेसचे विजयसिंह पंडित, भाजपचे लक्ष्मण पवार, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू देवकते यांच्यासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
शक्तीप्रदर्शन करीत संदीप क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल
बीड विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी राष्ट्रवादीचे उमेवार संदीप क्षीरसागर यांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच सभेच्या माध्यमातून निवडून देण्याचे आवाहन देखील क्षीरसागर यांनी केले.
यावेळी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, मा.आ.उषा दरडे, सय्यद सलीम, सुनील धांडे, जनार्धन तुपे, बाळासाहेब घुंबरे, कुलदिप करपे, हेमा पिंपळे, दिपक कुलकर्णी, डी.बी बागल यांची उपस्थिती होती.
यावेळी सभेचे प्रास्ताविक गंगाधर घुंबरे यांनी केले. शुक्रवारी संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी. आ. सय्यद सलीम, सुनील धांडे, उषा दराडे या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
रॅली व सभेच्या ठिकाणी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या.