कुलगुरूंची अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:46+5:302021-07-10T04:23:46+5:30
अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालयास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली. यावेळी ...
अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालयास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात फिरून लागवड केलेल्या ११ हजार विविध जातीच्या वृक्षांची पाहणी करून येथील कामांचा आढावा घेतला.
याप्रसंगी अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे व सहकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, गेल्या काही वर्षापासून महाविद्यालयाचा परिसर सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. अंबाजोगाई नगरीला शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक वारसा आहे. अशा नगरीमध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा संस्थांचा परिसर हा वृक्षराजींनी, फुलफळांनी आणि विविध पक्षांनी नटलेला असावा अशी समाजाची अपेक्षा असते. येथील झालेला कायापालट पाहून मला अभिमान आणि आनंद वाटत आहे.
याप्रसंगी डॉ. सुहास जाधव, डॉ. नरेशकुमार जायेवार, डॉ.नरेंद्र कांबळे, यादव पाटील, इरफान पठाण, स्वप्निल शिल्लार, दत्तात्रय अंबाड, प्रगतशील शेतकरी संभाजी अबाड यांची उपस्थिती होती.