शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:53 PM2019-05-31T23:53:46+5:302019-05-31T23:54:43+5:30
अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
बीड : शेतकरी हा जिल्ह्यातील विकासाचा केंद्रबिंदू आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी निविष्ठा विकणारे विक्रेते यांच्या तो सतत संपर्कात असतो. त्याला योग्य मार्गदर्शन केले तर फायदा होऊ शकतो, परंतु स्वत:च्या फायद्यासाठी अनधिकृत दर्जाहीन बियाणे कीटकनाशके, खते शेतक-यास विक्री केले तर त्याचे पिकाचे नुकसान होते याची झळ त्याच्या कुटुंबाला देखील बसते त्यामुळे शेतकºयांचे शोषण करुन फायदा साधणा-या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करु असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व कृषी सेवा केंद्र बियाणे व खातांचे मुख्य विक्रेत्यांची कार्यशाळा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयत संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र निकम, संगीता पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक बी.एम. गायकवाड, कागदे, कृषी निविष्ठा विक्रेता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, जिल्हाध्यक्ष सत्यनारायण कासट यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी जिल्हा पातळीवर खरीप हंगामपूर्व तयारीबाबत कृषी विभाग करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच कृषी निविष्ठा विक्रेता यांच्यामार्फत शेतकºयांना आवश्यक माहिती पोहोचावी, यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन दिले असे निकम म्हणाले. कार्यशाळेसाठी कृषी निविष्ठा विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, कृषी व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कृषी सेवा केंद्र चालकांना आवाहन
बोंडअळी निर्मुलनासाठी चोरबीटीची विक्री कृषी सेवा केंद्र चालकांनी करु नये. तसेच प्रशासनाने बंदी घातलेले खते, बियाणे विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुका स्तरावर पथके नेमून तपासणी करण्यात येत असून, खते-बियाणे संदर्भात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरीय पथके नेमण्याचे आदेश
जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले,कृषी क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत, अशावेळी विक्रेत्यांनी दर्जेदार कृषी साहित्य विकावे.
पाऊस पाणी, वातावरण ,नैसर्गिक आपत्ती यांच्याशी संघर्ष करून हा भूमिपुत्र अन्नधान्य पिकवत असतो. त्याच्याशी संवेदनशीलपणे वागणूक देऊन काम करावे.
मिश्र खतांचे नियमबाह्य उत्पादन व विक्रीवर बंधने असून अशा घटनांमध्ये दोषी आढळणाºयांवर कारवाई केली जाईल असे पाण्डेय म्हणाले.
रासायनिक खते व औषधे मानवी जिवनासाठी घातक असल्याने याबाबत शेतकºयांना माहिती देऊन जनाजागृती करावी.
खते व कृषी निविष्ठांची विक्री करताना विविध खतांबरोबरच सेंद्रिय खते, बायोकंपोस्ट याचा वापर व माहिती देण्याकडे कल असावा.
वजन, दर, दर्जा राखला जावा. फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा स्तरावरून पथके नेमावीत तसेच वजनाबद्दल तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.