नुकसानग्रस्तांना मदत मिळेल, तशा सूचनाही दिल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:47+5:302021-09-26T04:36:47+5:30
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील मांजराकाठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच भागाची पालकमंत्री ...
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील मांजराकाठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच भागाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे अश्वासन त्यांनी दिले. याबाबत संबंधित अधिकारी व विमा कंपनीला सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मा.आ. पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते दत्ता पाटील, गोविंदराव देशमुख, राजेश्वर चव्हाण, शिवाजी सिरसाट, बबन लोमटे, विलास मोरे, आबा पांडे, प्रशांत जगताप, अरुण जगताप, ताराचंद शिंदे, रणजित लोमटे, सुधाकर शिनगारे, सत्यजित सिरसाट, बाळासाहेब देशमुख, बालासाहेब गंगणे, सतीश गंगणे, भागवत गंगणे, तहसीलदार विपीन पाटील, तालुका कृषी अधिकारी बर्वे, महावितरणचे देशपांडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगताप आदींची उपस्थिती होती.
कदम कुटुंबाला ४ लाखांचा धनादेश
अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथील राम कदम यांचा मांजरा नदीच्या पात्रात वाहून गेल्याने शुक्रवारी मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करून मृतदेह बाहेर काढला. या कदम कुटुंबीयांची मुंडे यांनी भेट घेत सांत्वन केले. घरातील एकमेव कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या पत्नी ठकूबाई कदम यांच्यावर मुलाबाळांची जबाबदारी आली आहे. मुंडे यांच्या सूचनेवरून प्रशासनाने गतिमान प्रक्रिया राबवत राज्य सरकारच्या वतीने कदम कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.
250921\25_2_bed_32_25092021_14.jpeg
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकेच त्यांच्या हातात ठेवली.