दिंद्रुडमध्ये पॅनलचा विजय, मात्र प्रमुखाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:34+5:302021-01-19T04:35:34+5:30
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या दिंद्रुड येथील दिलीप कोमटवार यांच्यासह सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राम ...
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या दिंद्रुड येथील दिलीप कोमटवार यांच्यासह सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राम उबाळे, शिवसेनेचे संजय शिंदे, नारायण चांदबोधले, परमेश्वर नायगावकर, राष्ट्रवादी अल्पसंख्यक सेलचे तालुकाध्यक्ष अकील सय्यद, बाबासाहेब देशमाने, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ कटारे, भाजपा माजी पं. स. सदस्य मधुकर देशमाने यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन ग्रामविकास पॅनलने पाच प्रभागात १५ उमेदवारांना उभे करत निवडणूक लढविली. दिंद्रुडच्या सार्वभौम विकास, शांतता व संयमी राजकारण या मुद्यावर मतदारांनी कौल दिला आहे. या निवडणुकीत केंद्रस्थानी असलेल्या प्रभाग-५ मध्ये मात्र पॅनल प्रमुख दिलीप कोमटवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या विरोधात महेश ठोंबरे हे युवा उमेदवार निवडून आले. परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे अजय कोमटवार, सुनिता बाबासाहेब जाधव, गंगाबाई बाबुराव कटारे, ज्योती रमेश शिंदे, अविद्या देशमाने, अतुल चव्हाण, भारत गौंडर, भागुबाई विश्वनाथ चांदबोधले, सिंधू रामेश्वर उबाळे, कमलबाई सुरवसे, नाजमीन अजीम शेख हे उमेदवार विजयी झाले. तर जनसेवा ग्रामविकास आघाडीचे गौतम ठोंबरे, कीर्तीका गुलाब देशमाने, वसंत कटारे व महेश ठोंबरे हे उमेदवार या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत.