Video: शेतकऱ्याने आता काय करावे? पुराच्या पाण्यात डोळ्यादेखत ४ हजार कोंबड्या वाहून गेल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:56 PM2022-10-13T19:56:59+5:302022-10-13T19:58:14+5:30
आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील शेतकऱ्याचे ८ लाखांचे नुकसान
- नितीन कांबळे
कडा (बीड) : सोलेवाडी येथील शिवारात पुराचे पाणी थेट शेडमध्ये घुसल्याने त्यातील ४ हजार कोंबड्यांसह खाद्य वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास ८ लाखांचे लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत मोठ्या मेहनतीने उभारलेली पोल्ट्री होत्याची नव्हती झाली.
आष्टी तालुक्यातील सोलेवाडी सह परिसरात गुरुवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. नदीपासून काही अंतरावर खंडु झगडे यांचे कोंबड्याचे दोन शेड होते. यात पुराचे पाणी शिरल्याने ४ हजार कोंबड्यासह ११० खाद्य गोण्या वाहून गेल्या. जोरदार पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर मोठे आर्थिक नुकसान झाले.
बीड: शेतकऱ्याने काय करावे? आष्टीत ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान, सोलेवाडीत शेतातील शेडमध्ये पाणी घुसल्याने ४ हजार कोंबड्या वाहून गेल्या pic.twitter.com/OcPwb5Uqa1
— Lokmat (@lokmat) October 13, 2022
शेतकऱ्याने काय करावे?
ढगफुटी सदृश्य पावसाने सारेच उद्ध्वस्त झाले. ७० दिवसाचे झालेले चार हजार पिले व खुराक डोळ्यासमोर वाहुन गेल्याने शेतकरी झगडे हवालदिल झाले आहेत. दरम्यान, पावसात झगडे यांनी प्रयत्न केल्याने काही पिले वाचविण्यात यश आले आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक उभारी देण्यासाठी अर्थसाह्य करावे अशी मागणी खंडु झगडे यांनी केली आहे.