Video : मृत्यू समोर होता; मारेकऱ्याने तरुणाच्या पाठीला पिस्तुल लावून गोळी धाडली, असे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 02:05 PM2021-07-17T14:05:27+5:302021-07-17T14:20:19+5:30

Firing on youth in Gevarai taluka, Beed मादळमोहीत जुन्या भांडणातून एकावर शुक्रवारी भर दुपारी गोळीबार करण्यात आला 

Video: The killer shot youngster in the back with a pistol; The young man's life was saved by showing the situation | Video : मृत्यू समोर होता; मारेकऱ्याने तरुणाच्या पाठीला पिस्तुल लावून गोळी धाडली, असे वाचले प्राण

Video : मृत्यू समोर होता; मारेकऱ्याने तरुणाच्या पाठीला पिस्तुल लावून गोळी धाडली, असे वाचले प्राण

Next
ठळक मुद्देया प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गेवराई ( बीड ) : जुन्या भांडणातून एका तरुणावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवारी भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गालगत घडली. दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत.  हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता या ठिकाणी दोन तरुण मोटार सायकल वरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत एकाने पिस्तुल काढली.  काही कळायच्या आत पिस्तुल गावडे यांच्या पाठीला लावत त्याने गोळी झाडली. मात्र, गावडे यांनी मोठ्या हिम्मतीने सतर्कता दाखवत त्याच्या हाताला झटका दिला. यामुळे गोळी डोक्याला चाटून गेली आणि पुढील अनर्थ टळला. यानंतर मारेकरी तेथून फरार झाले.  

हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार ( रा. सावरगाव ) या दोघां विरोधात शुक्रवार रोजी रात्री उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून या प्रकरणी पुढील तपास सपोनि संदिप काळे हे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Video: The killer shot youngster in the back with a pistol; The young man's life was saved by showing the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.