video : चोरट्यांनी लढवली शक्कल न्यारी; सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून छत्री उघडून केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 05:07 PM2021-07-13T17:07:23+5:302021-07-13T17:07:45+5:30

Crime News in Beed : चोरट्यांनी किरणा मालाच्या गोडाऊनमध्ये केली चोरी

video: Thieves smart work; Theft by opening the umbrella so that it does not appear on CCTV | video : चोरट्यांनी लढवली शक्कल न्यारी; सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून छत्री उघडून केली चोरी

video : चोरट्यांनी लढवली शक्कल न्यारी; सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून छत्री उघडून केली चोरी

Next

दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरट्यांनी ओळख उघड होऊ नये यासाठी छत्री उघडून चोरी करण्याची नामी शक्कल वापरली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी दिंद्रुड पोलिस अधिक तपास करत आहेत. (Theft by opening the umbrella so that it does not appear on CCTV, incident in Beed ) 

अधिक वृत्त असे की, दिंद्रुड येथील गणेश मायकर या व्यापाऱ्याचे भर रस्त्यावरील किराणा दुकानचे गोडाऊन फोडून तेलाचे बॉक्स,गोडतेल डबे, बिस्किट बॉक्स, असा जवळपास ५० हजारांचा किराणामाल चोरट्यांनी चोरला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांना गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही असल्याची कल्पना होती. यामुळेच त्यांनी ओळख लपविण्यासाठी छत्री उघड करून चोरी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. दुसऱ्या एका घटनेत दिंद्रुड येथीलच देवदहिफळ रस्त्यावर अविनाश पांचाळ या व्यापाऱ्याच्या दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. येथील वीज पुरवठा बंद करून एक एलईडी टीव्ही व तिजोरीतील अंदाजे तीन हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. 


या प्रकरणी दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बीड येथील ठसेतज्ज्ञ पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. गेल्या काही दिवसात दिंद्रुड परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांसमोर चोरट्यांच्या मुसक्या आवळून चोऱ्या रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: video: Thieves smart work; Theft by opening the umbrella so that it does not appear on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.