गावकऱ्यांची सतर्कता अन् मानवतावादी दृष्टिकोनामुळे तरुण व्यावसायिकाला जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:50+5:302021-08-20T04:38:50+5:30

अनिल गायकवाड कुसळंब : दिवसभर आपल्या व्यवसायातून सुटका झाल्यानंतर रात्री झोपल्यानंतर झोपेतच अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने अत्यंत ...

Vigilance of villagers and humanitarian approach saves lives of young entrepreneurs! | गावकऱ्यांची सतर्कता अन् मानवतावादी दृष्टिकोनामुळे तरुण व्यावसायिकाला जीवदान !

गावकऱ्यांची सतर्कता अन् मानवतावादी दृष्टिकोनामुळे तरुण व्यावसायिकाला जीवदान !

Next

अनिल गायकवाड

कुसळंब : दिवसभर आपल्या व्यवसायातून सुटका झाल्यानंतर रात्री झोपल्यानंतर झोपेतच अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या तरुण छोट्या व्यावसायिकाला खासगी दवाखान्यात उपचारासाठी गावकऱ्यांनी तत्काळ तीन लाख रुपये जमा करीत उपचार केले आणि त्याला जीवदान मिळाले.

पाटोदा तालुक्यातील आदर्श गाव कुसळंब येथील बाळू सांगळे हा कटिंग सलूनचा व्यवसाय करून उपजीविका करणारा एक होतकरू, शांत, सुस्वभावी असा आजचा तरुण.

आपल्या दैनंदिन कटिंग सलून व्यवसायाचे काम संपवून रात्री झोपल्यानंतर त्याला झोपेतच मण्यार नावाच्या अत्यंत विषारी सापाने दंश केला. रात्री उशिरा त्याला प्रचंड त्रास होऊ लागला. खासगी दवाखान्यात उपचार केले असता कशाने त्रास होतोय हे समजू शकत नव्हते. शेवटी अहमदनगर येथील खासगी दवाखान्यात नेले. मध्यंतरी पंधरा तास वेळ लोटला; परंतु तेथील डॉक्टरांनी साप चावल्याची लक्षणे लक्षात घेऊन तत्काळ त्या दिशेने उपचार सुरू केले.

विषारी साप असल्याने मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, आदींसह मोठा खर्च होता; परंतु बाळू अत्यंत गरीब परिस्थितीतील असल्याने त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. ही बाब येथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्काळ स्पीकरवरून गावकऱ्यांना माहिती देऊन निधी जमा करण्याचे आवाहन केले आणि अगदी केवळ तीन तासांतच तीन लाख रुपयांच्या घरात रक्कम जमा झाली!

सदर रक्कम संबंधित हॉस्पिटल खर्च आणि इतर त्याच्या उपजीविकेसाठी वापरणार असून कुसळंबसह परिसरातील लांबरवाडी, बेदरवाडी, गंडाळवाडी, गवळवाडी, सुप्पा, वानेवाडी, आदींसह ग्रामस्थ आणि समाजधुरिण यांच्या अथक परिश्रमातून आणि मानवतावादी दृष्टिकोनातून जमा झाली.

दोन दिवस गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये असलेल्या बाळू सांगळेची तब्येत सुधारत असून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि गावकऱ्यांनी आर्थिक भार आपापल्या पद्धतीने उचलल्याने एका तरुण, गरीब, सुस्वभावी व्यावसायिकाचा प्राण वाचू शकला.

मानवतावादी दृष्टिकोनाचा संदेश

दरम्यान, एका सामान्य व्यावसायिकासाठी त्याला जीवदान देण्यासंदर्भात विविध जाती, धर्म, पंथ यांतील आणि विविध क्षेत्रांतील सामान्यजनांनी उचललेल्या खारीचा वाटा यामुळे आणि आर्थिक सहकार्यामुळे जीवदान मिळू शकले.

मेजर शिवाजीराव पवार (सरपंच, कुसळंब)

आर्थिक मदत आणि आधार देण्याची पूर्वापार परंपरा !

यापूर्वीही आदर्श गाव कुसळंबकरांनी संकटात सापडलेल्या विविध जणांना मदत केली आहे. गतवर्षी लोहार समाजातील एका भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी सर्वांनी मिळून ६५ हजार रुपये जमा करून तिला आर्थिक आणि मानसिक आधार दिल्याचा वास्तव इतिहास आहे.

190821\anil gaykwad_img-20210816-wa0006_14.jpg

Web Title: Vigilance of villagers and humanitarian approach saves lives of young entrepreneurs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.