राज्यातील १० जिल्ह्यांत विलास बडे ‘मोस्ट वॉन्टेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:21 AM2017-11-28T00:21:38+5:302017-11-28T00:21:44+5:30

लुटारु टोळीचा म्होरक्या अट्टल गुन्हेगार विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याने खळबळ उडाली. राज्यातील १० जिल्ह्यांसह तमिळनाडू, कर्नाटकातील ४ जिल्ह्यांत त्याने धुमाकूळ घातला आहे. या सर्वांना तो हवा होता; परंतु धारूर पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो पलायन करण्यात यशस्वी ठरला.

Vilas Big 'Most Wanted' in ten districts of the state | राज्यातील १० जिल्ह्यांत विलास बडे ‘मोस्ट वॉन्टेड’

राज्यातील १० जिल्ह्यांत विलास बडे ‘मोस्ट वॉन्टेड’

googlenewsNext

सोमनाथ खताळ ।

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लुटारु टोळीचा म्होरक्या अट्टल गुन्हेगार विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याने खळबळ उडाली. राज्यातील १० जिल्ह्यांसह तमिळनाडू, कर्नाटकातील ४ जिल्ह्यांत त्याने धुमाकूळ घातला आहे. या सर्वांना तो हवा होता; परंतु धारूर पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो पलायन करण्यात यशस्वी ठरला. त्याच्या शोधासाठी राज्यातील पोलीस रात्रंदिवस धावाधाव करीत आहे. धारूर पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांवर वरिष्ठांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा गेल्याची चर्चाही ऐकावायस मिळाली.

विलास बडे, गणेश बडे या भावंडांसह बाळू पवार यांची टोळी आहे. इतर साथीदारांचाही यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या टोळीने बीड जिल्ह्यासह पुणे ग्रामीण, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर या १० जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला. एवढ्यावरच न थांबता या टोळीने तमिळनाडू व कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्येही गुन्हे केले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून अख्ख्या राज्यातील पोलीस या गुन्हेगारांच्या शोधात होते. गत महिन्यात बीड तालुक्यातील नेकनूरसह इतर तीन ठिकाणी एकाच रात्री त्यांनी वाटमारीचे चार गुन्हे केले. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे यांनी आपल्या फौजफाट्यासह गणेश बडे व बाळू पवार या दोघांच्या मुसक्या आवळल्या; परंतु विलास मात्र त्यांच्या हातून निसटला होता.

बीड पोलीस इकडे शोध घेत असताना पुणे पोलिसांनी विलासला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला धारूर पोलीस ठाण्यात आणले होते. तेथूनच त्याने पोलिसांची नजर चुकवून धूम ठोकली.

रविवारी आरोपी पळून गेल्यानंतर सोमवारी बीड पोलीस दलात एकच खळबळ उडाली. ठाण्यातील गुन्हे शोधण्यात जरी अपयश येत असले तरी दुसºयांनी शोधून दिलेल्या आरोपींचा तरी व्यवस्थित सांभाळ करा, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा होती. धारूर पोलिसांबद्दल सर्वत्रच संताप व्यक्त होत आहे.

होमगार्डला मागितली ‘लिफ्ट’
पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा डाव फत्ते होताच विलासने आश्रयासाठी सुरक्षित स्थळ शोधणे सुरू केले.
रस्त्याने जाताना त्याने दुचाकीवरून जाणा-या इसमास ‘लिफ्ट’ मागितली ती देणाºया इसमाच्या अंगावरील खाकी पँट, बूट पाहून तो पोलीस असल्याचा संशय आल्याने दुचाकीवरून अचानक उतरत विलासने धूम ठोकल्याची माहिती खात्रीलायक पोलीस सूत्रांनी दिली.

लॉकअपबाहेर काढून चौकशी
धारूर पोलिसांनी विलासला चौकशीसाठी लॉक अपच्या बाहेर काढले. याच वेळी काही लोक फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आले. कुख्यात आरोपी असतानाही त्याच्याजवळ कुणीही न थांबता अधिकारी, कर्मचारी इतर कामात व्यस्त झाले. हीच संधी साधून विलासने ठाण्यातील खिडकीतून पलायन केले.

Web Title: Vilas Big 'Most Wanted' in ten districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.