आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 02:22 PM2023-10-15T14:22:08+5:302023-10-15T14:22:17+5:30
रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेवराई : मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी शनिवार रोजी अंतरवाली सराटी येथे गेलेल्या शहरातील पवार गल्ली येथील ३४ वर्षीय तरुणांचा परत येत असताना युवकास अचानक चक्कर आली, उलट्या झाल्या त्याला तातडीने दवाखाना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यावर रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलास पवार वय ३४ राहणार पवार गल्ली गेवराई असे उष्णघाताने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असुन त्यांचे शहरातील माळी गल्ली भागात ईलेट्रीकल्स चे दुकान असुन तो शनिवार रोजी सकाळी मनोज जरांगे पाटिल यांच्या सभेसाठी अंतरवाली सराटी येथे गेला होता. त्यात वाढते तापमान व उन्हामुळे विलास पवार याला उष्माघाताने चक्कर आली.त्याला तातडीने शहरातील एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.मात्र त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे.
तापमानाचा पारा अधिक आहे. विलास पवार याचा मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.त्यांच्यावर रविवार रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील चिंतेश्वर स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडिल, पत्नी,एक भाऊ,भावजाई, तीन मुली असा मोठा परिवार आहे.