गावपातळीवरील कोरोना दक्षता समित्या नामधारीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:33 AM2021-04-24T04:33:52+5:302021-04-24T04:33:52+5:30
गेवराई : मास्कचा वापर करणे, सोशल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, याबाबत जनजागृती करूनही नागरिक जागरूक झालेले नाहीत. आपल्या ...
गेवराई : मास्कचा वापर करणे, सोशल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, याबाबत जनजागृती करूनही नागरिक जागरूक झालेले नाहीत. आपल्या गावात कोणते रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. याची बहुतांश गावांमधील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि दक्षता समितीला माहिती नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र समित्या नामधारीच दिसत आहेत. त्यामुळे या समित्या पुन्हा सतर्क होणे काळाची गरज आहे.
काही होमक्वारंटाइन रुग्ण बाहेर फिरत असतात. हे रुग्ण कोरोनाचा प्रसार वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.
वास्तविक कोरोना दक्षता समितीने लक्ष दिले, तर होमक्वारंटाइन रुग्ण घराबाहेर पाडण्याचे धाडस करणार नाहीत. गेवराई तालुक्यात शुक्रवारी काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील काही रुग्ण होमक्वारंटाइन केलेले आहेत. हे रुग्ण १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ नयेत. अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. मात्र, मला काही लक्षणे नाहीत. मी आता बरा आहे. मला काहीच त्रास नाही, अशी कारणे सांगत काही रुग्ण घराबाहेर पडून कोरोनाचा प्रसार वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे झाले आहे. मात्र, यासाठी कोरोना दक्षता समित्या कार्यरत होणे गरजेचे आहे.
गेवराई तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या व उपलब्ध सुविधा पाहता प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा एकटीच आघाडीवर लढत असल्याचे चित्र आहे, अन्य विभागांची याबाबत उदासीनता चिंतेचा विषय आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. ग्रामदक्षता समितीने तलाठी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
जबाबदारी घेणे गरजेचे
कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांचेही यासाठी सहकार्य गरजेचे आहे.
शासकीय कर्मचारी झटकतात. बहुतांश तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे शहरात राहून आपल्या नेमणुकीच्या गावी ये-जा करतात. नियमित ते मुख्यालयी हजर नसतात. सध्याची स्थिती पाहता, सर्व पथकाने गावात हजर राहणे गरजेचे आहे.
....