तांड्यांवरील गावठी दारूचे अड्डे उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:27 AM2021-01-14T04:27:58+5:302021-01-14T04:27:58+5:30

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट अंबाजोगाई : राज्य उत्पादन शुल्कच्या ...

Village liquor dens on Tandyan destroyed | तांड्यांवरील गावठी दारूचे अड्डे उद‌्ध्वस्त

तांड्यांवरील गावठी दारूचे अड्डे उद‌्ध्वस्त

Next

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

अंबाजोगाई : राज्य उत्पादन शुल्कच्या विभाग निरीक्षकांच्या पथकाने अंबाजोगाई शहरालगत चनई तांडा आणि दगडू तांडा या दोन ठिकाणी धाड टाकून अवैधरीत्या गावठी मद्यनिर्मितीचे अड्डे उद‌्ध्वस्त केले. या कारवाईत १ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला, तसेच एकूण ३ गुन्हे दाखल केल्याची माहिती प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड यांनी दिली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे. अंबाजोगाई तालुक्यात चनई तांडा आणि दगडू तांडा परिसरात गस्तीवर असताना केलेल्या कारवाईत अज्ञात आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण ३ गुन्हे नोंदवले. यात ३ बेवारस गुन्ह्यांचाही समावेश आहे. या धाडीत ५ हजार ४०० लिटर रसायन, २०० लिटरचे २७ लोखंडी बॅरल, असा एकूण १ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला. बुधवारी अतिशय दुर्गम ठिकाणी केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड, दुय्यम निरीक्षक ए.एन. पिकले, जवान बी.के. पाटील, जवान तसेच वाहनचालक के.एन. डुकरे यांनी सहभाग घेतला होता.

जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सातत्याने धाडी टाकण्यात येतात. प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड यांनी सन २०२० ते आतापर्यंत अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर, अवैध मद्यनिर्मिती, अवैध दारू वाहतूक, तसेच अनेक ढाबे यावर वेळोवेळी कारवाई करीत तब्बल ३८ लक्ष रुपयांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला, तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल केले.

Web Title: Village liquor dens on Tandyan destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.