पदरमोड करून सरपंचाने केला गावातील रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:18+5:302021-08-27T04:36:18+5:30

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमसेन धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी विविध विकासकामे करून ...

The village road was paved by the sarpanch | पदरमोड करून सरपंचाने केला गावातील रस्ता

पदरमोड करून सरपंचाने केला गावातील रस्ता

Next

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमसेन धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी विविध विकासकामे करून कायापालट केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेला शब्द पाळत अपेक्षेपेक्षा जास्त विकासकामे केली आहेत. त्यांच्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त एकशिंगे वस्तीवरील रस्ता, खोटे वस्ती, पवार वस्ती, ठोंबरे वस्ती आदी ठिकाणचा रस्ता स्वखर्चाने केला आहे. गावातील रस्ते तसेच वस्त्यांवर जाणारे रस्ते मुरूम टाकून चांगले केले आहेत. गावाच्या विकासाबरोबरच वस्तीवरील ग्रामस्थांनाही सुविधा पुरविण्यासाठी स्वखर्चाने पदरमोड करून कामे केली जात आहेत. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ससाणे व खिळे वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना संबंधित रस्त्याने दुचाकीवरून, तसेच मोठ्या वाहनांसह पायी ये- जा करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. खड्डे असल्याने प्रवास करणे खूप जिकिरीचे बनले होते. ही माहिती कळताच सरपंच ससाणे यांनी कसलाही विलंब न लावता तत्काळ जेसीबी व ट्रॅक्टर लावून तो रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून वाहतुकीसाठी सोईस्कर केला. याप्रसंगी सरपंच सावता ससाणे, माजी उपसरपंच रामदास चौधरी, रामा पाटील चौधरी, सोमनाथ ससाणे, मारुती ससाणे व इतर

उपस्थित होते.

गावाला विकासाचे मॉडेल बनवणार

आजही तालुक्यातील अनेक गावांतील वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नाहीत. रस्त्यांशिवाय गावाचा विकास नाही, म्हणून स्वखर्चाने मुरूम टाकून चांगल्या प्रकारे रस्ते तयार केले आहेत. गाव व परिसरातील प्रत्येक वस्तीवरील रस्ता करण्यात येणार आहे. ज्या वस्तीसाठी कच्चा रस्ता हवा असल्यास मागणी करताच मुरूम टाकून रस्ता चांगल्या प्रकारे तयार करण्यात येईल, असे सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले.

260821\img-20210825-wa0230_14.jpg

Web Title: The village road was paved by the sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.