केजमध्ये ग्रामसेवक रंगेहाथ चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:08 AM2019-08-28T00:08:46+5:302019-08-28T00:09:05+5:30
रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
केज : रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
धारुर तालुक्यातील गांजपूर येथील शेतकऱ्याची जानेगाव शिवारात जमीन असून त्यास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झाली होती. शेतकºयाने विहिरीचे काम केल्यानंतर बील काढण्यासाठी जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यांच्याकडे मस्टरवर स्वाक्षºया करण्याची मागणी केली. विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रु पयांची मागणी केली. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने सदर शेतकºयाने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २६ आॅगस्ट रोजी तक्र ार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हनपुडे पाटील, निरीक्षक गजानन वाघ , पोलीस नाईक अमोल बागलाने, मनोज गडळे, सखाराम घोलप, चालक जमादार सय्यद नदीम आदींनी केली.
असा रचला सापळा
या तक्र ारीची शहानिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असता तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २७ आॅगस्ट रोजी सापळा रचला. केज शहरातील समर्थनगर भागात ग्रामसेवकाच्या राहत्या घरासमोर सदर शेतकºयाच्याकडून तीन हजार रु पयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे (५७) यास रंगेहाथ पकडण्यात आले.