‘शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गावपातळीवर सर्वेक्षण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:09 AM2019-11-02T00:09:54+5:302019-11-02T00:11:09+5:30
जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बीड : जिल्ह्यात १९ आॅक्टोबरपासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या हंगामातील सरासरीच्या ४२९ टक्के इतका पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा कंपनीकडून तालुकास्तरावर नियुक्त केलेले कर्मचारी अपुरे असल्यामुळे शेतक-यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गाव पातळीवरील कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, प्रविण धरमकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर, विमा कंपनीचे प्रतिनिधी अमित गौडा यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाण्डेय म्हणाले, गाव पातळीवरील पिक विमाबाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांची समिती सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार असून या अहवालाच्या आधारे पिक विमा नुकसानीचे माहिती जिल्हा प्रशासनामार्फत विमा कंपनीस दिली जाईल, असे त्यांनी सांगीतले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील पीक कापणी करून सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेल्या पिकांसाठी तसेच सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे नुकसान झालेल्या पात्र शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी तालुका कृषी अधिकाºयांकडे गर्दी होत आहे. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक देखील बंद असल्याने अडचणीचे ठरत आहे.यामुळे गाव पातळीवर अर्ज स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांची अडचण दूर झाली आहे.
शेतक-यांनी काळजी करू नये
पिक विमा अर्जासोबतच राज्य शासनाकडून मिळणाºया नुकसान भरपाई मदतीसाठी देखील पंचनामे करण्यात येणार असून, त्याची माहिती राज्य शासनाकडे स्वतंत्ररित्या सादर केली जाईल यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टीसाठी मिळणाºया नुकसान भरपाईचा लाभ देखील मिळू शकेल यामुळे शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करु नये व काळजी करू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.