पंकजा मुंडेंच्या मदतीला ग्रामस्थ सरसावले; वैद्यनाथ कारखान्यासाठी एकाच दिवसात दीड कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:00 PM2023-10-03T12:00:24+5:302023-10-03T12:02:41+5:30
वैद्यनाथ कारखान्याचा थकीत जीएसटी भरण्यासाठी दानशूर सरसावले
- नितीन कांबळे
कडा (बीड)- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जी एसटी विभागाकडून काही दिवसापुर्वी १९ कोटी थकित रकमेसाठी नोटीस बजावण्यात आली होती. सध्या पंकजा मुंडे अडचणीत असल्याने ती रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जिल्हाभरातून एकाच दिवसात जवळपास दीड कोटी रूपये निधी जमा करण्यात आला आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची १९ कोटी थकित जीएसटी पोटी संबंधित विभागाकडून काही दिवसापुर्वी नोटीस बजावण्यात आली होती.या अनुषंगाने त्यांना हातभार लावण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक लोकसहभागातून पैसा जमा करत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पंकजा मुंडे यांना हातभार लावण्यासाठी मुंडे यांचे चाहते लोकसहभागातून पैसा उभा करत आहेत. एका दिवसात जवळपास दीड कोटीच्या पुढे रक्कम जमा झाली. दसरा मेळाव्यात ही रक्कम पंकजा मुंडे, व खा.प्रितम मुंडे याच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून यांनी केला निधी उभा :
डाॅ.शालिनीताई कराड ५० लाख, राजाभाऊ दगडखैर ११ लाख ११ हजार १११, दत्ता बडे १ लाख ११ हजार, विजय गोल्हार ११ लाख, युनुसभाई शेख ११ लाख, कासेवाडी ग्रामस्थ ७ लाख २० हजार, रामदास बडे ५ लाख, संदिपान ठोंबरे ५ लाख, प्रकाश खेडकर १ लाख ५० हजार ,आण्णासाहेब भोसले १ लाख,भारत तोंडे १ लाख,विष्णू मुंडे १ लाख, व्यंकटी मुंडे १ लाख, विवेक १ लाख, डाॅ.लक्ष्मण जाधव ५१ हजार, धनराज मुंडे ५१ हजार, विनोद बागर ५१ हजार, आजिनाथ सानप ५१ हजार, रामराव खेडकर ५० हजार, यादव महात्मे ५१ हजार, तेजस तिडके २१ हजार, यांनी रक्कम जमा केली आहे.