पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लेंडीनदीच्या पाण्यात बसून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:11 PM2021-10-09T19:11:18+5:302021-10-09T19:12:26+5:30
गेवराई ते जातेगांवकडे जाणाऱ्या रोहितळ येथील रस्त्यावरील लेंडी नदीवर असलेला पुल गेल्या अनेक महिन्यापासून तुटला आहे
गेवराई : तालुक्यातील रोहितळ येथील लेंडी नदीवरील पुल गेल्या अनेक महिन्यांपासून तुटला आहे. या पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज सकाळी नदीच्या पाण्यातच आमरण उपोषण सुरु केले आहे.
गेवराई ते जातेगांवकडे जाणाऱ्या रोहितळ येथील रस्त्यावरील लेंडी नदीवरिल पुल गेल्या अनेक महिन्यापासून तुटला आहे. या पुलाच्या मागणीसाठी सकाळी विविध गावातील नागरिकांनी रोहितळ येथील तुटलेल्या पुलावर जमले. आंदोलकांनी लेंडी नदीच्या पाण्यामध्ये बसून आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान, प्रभारी तहसीलदार रामदासी, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. आंदोलकांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र देऊन सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घालून देण्याच्या आश्वासनावर उपोषण मागे घेण्यात आले.
आंदोलनात सरपंच मुकुंद बाबर, सरपंच जगन्नाथ काळे,प्रा. पी. टी. चव्हाण, कैलास माने, गोरसेना चे विभागीय उपाध्यक्ष अनिल राठोड, ज्ञानेश्वर खाडे, सरपंच सतीश चव्हाण, ईश्वर पवार, दत्ता वाघमारे, विशाल पांढरे, संदीप कोकाट, कालिदास काकडे, सुनील मिसाळ, गोपाल चव्हाण, अभय पांढरे, भरत बादाडे, अंकुश धोडरे, आर आर आबा बहीर, सुलेमान, विलास चव्हाण , सरपंच सिद्धेश्वर काळे, सरपंच काकासाहेब खेत्रे, उपसरपंच रामेश्वर पवार, उपसरपंच पंडित गायकवाड, बाबासाहेब गोरे आदींचा सहभाग होता. यावेळी एपीआय प्रताप नवघरे, अमोल सोनवणे यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला.