पुरामुळे पहाडी दहीफळ येथे ग्रामस्थ अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:13+5:302021-09-27T04:37:13+5:30
धारूर : शहर व तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक ...
धारूर : शहर व तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती, तर पहाडी दहीफळ येथे कुंडलिका नदीला पाणी सोडल्याने ३० ते ३५ नागरिक शेतात अडकले होते. त्यांना रात्र जागून काढावी लागली. नदीचे पाणी रविवारीही कमी झाले नव्हते. यामुळे नागरिक तिकडेच अडकून पडले होते.
धारूर तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. यामुळे पाणीच पाणी झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, शेतातील कापूस, तूर, ऊस या पिकांचे पावसाने नुकसान झाले आहे. दरम्यान, तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. ग्रामस्थांना अधार दिला. पावसामुळे धारूर-तांदळवाडी, धारूर-आडस, धारूर-इसरडोह, धारूर-वडवणी या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.
260921\img_20210926_102550_14.jpg