Vinayak Mete: 'आपले साहेब गेले'; शिवसंग्राम भवनवर कार्यकर्त्यांची गर्दी, अनेकांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 10:13 AM2022-08-14T10:13:35+5:302022-08-14T11:16:34+5:30

बीडच्या माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडें, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे

Vinayak Mete: Your Mete sir is gone; Crowd of activists at Shiv Sangram Bhavan beed, tears in many eyes of karyakarta vinayak mete | Vinayak Mete: 'आपले साहेब गेले'; शिवसंग्राम भवनवर कार्यकर्त्यांची गर्दी, अनेकांच्या डोळ्यात पाणी

Vinayak Mete: 'आपले साहेब गेले'; शिवसंग्राम भवनवर कार्यकर्त्यांची गर्दी, अनेकांच्या डोळ्यात पाणी

googlenewsNext

बीड - शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉ. धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. या घटनेनं महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. आपल्या नेत्यांच्या निधनाचे वृत्त कार्यकर्त्यांची झोप मोडणारे होते, ही बातमी समजताच बीडमधील कार्यकर्त्यांनी शिवसंग्राम भवनावर धाव घेतली आहे. 

बीडच्या माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडें, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर, शिवसंग्रामचे कार्यकर्तेही कार्यालयावर एकत्र आले आहेत. विनायक मेटे हे चळवळीतील नेते होते, मराठा आरक्षणासाठी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू होता. त्यामुळे, मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षण आंदोलकांनाही या घटनेनं मोठं दु:ख झालं आहे. या निधनाची बातमी कळताच अनेकांनी एकमेकांशी फोनवरुन संपर्क केला, तर काहींनी बीडहून मुंबईकडे धाव घेतल्याचे समजते. 

विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त सर्वांनाच धक्कादायक आहे. महाराष्ट्रासह बीड जिल्हाही पहाटेच्या साखरझोपेत असताना भूकंप व्हावा, अशी ही बातमी कानावर आली. मेटेंची कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी शिवसंग्राम भवन कार्यालयावर गर्दी केली आहे. या घटनेनं कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली असून अनेक कार्यकर्ते धाय मोकलून रडत आहेत. आपले साहेब गेले... अशा आर्त हाका कार्यकर्त्यांच्या मुखातून आपसूकच निघत आहेत. अनेकांच्या डोळ्यातील अश्रूही या दु:खाची जाणीव करुन देत आहेत. दरम्यान, विनायक मेटेंचे भाऊ राम हरी मेटे हे शिवसंग्राम भवन येथे दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी शोक व्यक्त केला जातोय

पंकजा मुंडेंकडून श्रद्धांजली

''दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटेंसारख्या सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला. मी त्यांना 22-23 वर्षे पाहते आहे, कुठल्याही कौटुंबिक पार्श्वभूमीविना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्यच्या जीवावर उभा असणारा हा नेता. आज मराठा चळवळीतील नेता हरपला, अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. तसेच, भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. 
 

Web Title: Vinayak Mete: Your Mete sir is gone; Crowd of activists at Shiv Sangram Bhavan beed, tears in many eyes of karyakarta vinayak mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.