कोरोना नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:43+5:302021-09-04T04:39:43+5:30

-------------------------------------------- ढोल-ताशांची विक्री मंदावली अंबाजोगाई : गणेशोत्सवामध्ये ताशा, ढोलची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. यावर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. ...

Violation of corona rules | कोरोना नियमांचे उल्लंघन

कोरोना नियमांचे उल्लंघन

Next

--------------------------------------------

ढोल-ताशांची विक्री मंदावली

अंबाजोगाई : गणेशोत्सवामध्ये ताशा, ढोलची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. यावर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणरायांचे घरोघरी आगमन होत असले तरी उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे दरवर्षी मागणी असलेल्या ढोल-ताशाची खरेदी यावर्षी थंडावली आहे. दुरुस्तीची कामेही कमी प्रमाणात येत आहेत.

-----------------------------------------

काटेरी झुडपे तोडण्याची मागणी

अंबाजोगाई: ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या काटेरी झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनापूर्वी काटेरी झुडपे तोडावीत. अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

-----------

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले

अंबाजोगाई : शहरातील अनेक प्रभागांमध्ये पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे अनेक भागात नवीन नळ कनेक्शन जोडणी सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मोहिमेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने जुन्याच पाईपलाईनमधून पाणी सोडले जात आहे. यामुळे पाणी वितरणाचे रोटेशन कोलमडले आहे.

---------------------

‘झाडांना ट्री गार्ड उपलब्ध करून द्यावे’

अंबाजोगाई : शहरात अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. मात्र अनेक नवीन झाडांना संरक्षण नाही. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ट्री गार्ड उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे. नागरिकांकडून पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड केली जात आहे. यामध्ये नागरिकांनी स्वखर्चातून वृक्ष लागवड केली आहे. अनेक भागांमध्ये मोकळ्या जागेत लावलेली झाडे जनावरे फस्त करीत आहेत.

Web Title: Violation of corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.