कोरोना नियमांचे उल्लंघन; साडेतीन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:57+5:302021-03-19T04:32:57+5:30

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कारवाया करण्यास प्रशासनाकडून सुरूवात केली. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ...

Violation of corona rules; A fine of Rs 3.5 lakh was recovered | कोरोना नियमांचे उल्लंघन; साडेतीन लाखांचा दंड वसूल

कोरोना नियमांचे उल्लंघन; साडेतीन लाखांचा दंड वसूल

Next

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कारवाया करण्यास प्रशासनाकडून सुरूवात केली. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार १ कारवाया करण्यात आल्या असून नागरिकांकडून तब्बल ३ लाख ४७ हजार ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवायात बीड तालुका अव्वल असून पाटोद्याचा निच्चांक आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना काेरोना नियम पाळण्याबाबत आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आली. तसेच जे लोक विनामास्क फिरतील, सोशल डिस्टन्स ठेवणार नाही, अशांना २०० ते १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला. याबाबत पालिका, पोलिसांना कारवाया सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात १००१ नागरिकांवर कारवाया करण्यात आल्या. त्यांच्याकडून ३ लाख ४७ हजार ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली.

दरम्यान, कारवायांमध्ये बीड तालुका अव्वल आहे. अंबाजोगाई, परळी या दोन मोठ्या शहरांमध्येच कारवायांचे शतक ओलांडले आहे. इतर तालुक्यांमध्ये कारवायांचा आकडा अल्प आहे. प्रशासनाने दंडात्मक कारवाया करण्यासह नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन करावे, अशीही मागणी होत आहे.

कोट

नागरिकांना कोरोना नियम पाळण्याबाबत आवाहन केले जात आहे. तरीही काही लोक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा लोकांवर दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. आतापर्यंत ३ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

डॉ.आर.बी.पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

----

अशी आहे आकडेवारी

अ.क्र.तालुक्याचे नावदंड वसूल केल्याएकूण वसुली

नागरिकांची संख्या

१गेवराई ५२ ४६०००

२धारूर ३२ ३४५००

३अंबाजोगाई ७६ २१९००

४केज ३२ ५४००

५वडवणी ६२ २३७००

६माजलगाव १७१ ५९४००

७बीड २१० ४६७००

८परळी १८० ४९०२०

९पाटोदा २५ २५००

१०शिरूर कासार ९९ २५९००

११आष्टी ६२ ३२५००

एकूण १००१ ३४७५२०

Web Title: Violation of corona rules; A fine of Rs 3.5 lakh was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.