शेतीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:10+5:302021-05-08T04:36:10+5:30
बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा शिवारात असलेल्या शेतीच्या मोजणीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पिंपळनेेर पोलीस ठाण्यात गुन्हा ...
बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा शिवारात असलेल्या शेतीच्या मोजणीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पिंपळनेेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मे रोजी घडली आहे, तर ६ मे रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चंद्रकला अंकुश राऊत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. म्हाळसजवळा शिवारातील शेतात ‘ही जागा आमचीच आहे, तुम्ही बांधाचा चिरा आमच्या जागेत का रोवला’, असे म्हणत चंद्रकला यांचे पती अंकुश राऊत यांनी दोन मुलांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात मनोज शेषेराव खांडे, बालाजी शेषेराव खांडे, सिद्धेश पांडुरंग खांडे, नितीन विठ्ठल खांडे, संतोष खांडे, बाबासाहेब खांडे, शेषेराव खांडे (सर्व रा. म्हाळसजवळा) व संतोष आमटे (रा. खांडेपारगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणात नितीन विठ्ठल खांडे यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून त्यांचे व राऊत यांचे शेत शेजारी शेजारी असून, जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. पोलिसांत तक्रार देण्यासाठी खांडे यांचे भाऊ जात असताना सूतगिरणीपुढे अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अंकुश राऊत, भागवत राऊत, नागनाथ राऊत, चंद्रकला राऊत (सर्व रा. म्हाळसजवळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.