चोरट्यांची व्हीआयपी ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:24 AM2018-11-18T00:24:40+5:302018-11-18T00:25:15+5:30

महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. आता चोरटेही ‘व्हीआयपी’ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मात्र सावध राहण्याची आवश्यकता आहे.

VIPs 'VIPs' | चोरट्यांची व्हीआयपी ‘एन्ट्री’

चोरट्यांची व्हीआयपी ‘एन्ट्री’

Next
ठळक मुद्देबीडमधील प्रकार : महागड्या कारमधून आले अन् कुरिअरवाले असल्याचे सांगून दोन घरे फोडून गेले

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. आता चोरटेही ‘व्हीआयपी’ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मात्र सावध राहण्याची आवश्यकता आहे.
मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी चोरी करण्याचे नवनवीन फंडे वापरल्याचे समोर येत आहे. बीडमध्येही असेच दोन प्रकार समोर आले आहेत. एखादा नेता किंवा वर्ग एक च्या अधिकाऱ्यासारख्या गाडीतून रूबाबात येत चोरटे सहज घर फोडून निघून जात असल्याचे दिसून येत आहे. बीड शहरातील चाणक्य पुरीत राहणारे व गेवराई पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिरुद्ध ज्ञानोबा सानप यांच्या घरातून ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये चोरटे पांढºया शुभ्र कारमधून आले. सानपे यांच्या घराच्या दुसºया मजल्यावर गेले. येथे खालच्या घरचे कोठे गेले? आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगितले. शेजाºयांनी ते गावी लग्नाला गेल्याचे सांगून त्यांना सोडण्यास बाहेर आले. पाच मिनीटांनी चोरटे एक चक्कर मारून पुन्हा सानप यांच्या घराजवळ आले आणि अवघ्या पाच मिनिटात घर फोडून ऐवज लंपास करत रूबाबात पोबारा केला. असाच प्रकार कालिकानगर भागातही घडला. येथे रमेश सानप यांच्या घरातून ६८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तपास पोउपनि आर.ए.सागडे, बी.एस.ढगारे हे करीत आहेत.
अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
नवीन टोळ्या असल्याने तपास अवघड
मागील काही दिवसांपासून नवीन टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. रेकॉर्डवरील चोरट्यांची स्टाईल पोलिसांना माहिती असते. मात्र आता नवीन चोरटे आल्याने त्यांना घटनेचा तपास लावणे अवघड बनत आहे. मागील काही दिवसांत पकडलेले चोरटे हे नवखे असल्याचे दिसून येते. त्यांना पकडणे हे पोलिसांसाठी आव्हान आहे.
अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा
घरात किंवा परिसरात एखादी व्यक्ती अनोळखी दिसल्यास तात्काळ तिला हटका. त्यांचे खरच काम आहे, की उद्देश वेगळाच याची तपासणी करावी. दुर्लक्ष केल्यास घटना घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींपासून सावध रहावे. चोरटे वेगवेगळा बहाणा करून घरात प्रवेश करून चोरी करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे.
नागरिकांनो, दर्जेदार
कुलूप बसवा !
‘लाखोंचे घर आणि १०० रुपयांचे कुलूप’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर काही लोकांनी याबाबत दर्जेदार कुलूप बसविले. मात्र काही लोक आजही याबाबत अनभिज्ञ आहेत. चाणक्यपुरतील लाखोंच्या बंगल्याला किरकोळ कुलूप होते. त्यामुळेच चोरटे सहज घरात शिरले. आतातरी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे.
चोरीचे नवनवीन फंडे
मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रीय झाले आहेत. जुन्या गुन्हेगारांना शोधणे पोलिसांना शक्य असते. मात्र नवख्या गुन्हेगारांची चोरी करण्याची मोडस आणि ते रेकॉर्डवर नसल्याने शोधण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांचे नवनवीन फंडेही अनेकवेळा अचंबित करणारे असतात. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: VIPs 'VIPs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.