विषाणूजन्य आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:49+5:302021-06-30T04:21:49+5:30
स्वच्छतागृहाची दुर्दशा नेकनूर : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची ...
स्वच्छतागृहाची दुर्दशा
नेकनूर : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
कारवाईची मागणी
बीड : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. नागरिक विनामास्क फिरत आहेत. या लोकांवर कारवाईची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील चक्रधरनगर, शिंदेनगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागांमधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. मात्र, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.