बीडचा विष्णू तिडके पीएसआय परीक्षेत राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 04:24 PM2019-03-08T16:24:04+5:302019-03-08T16:25:21+5:30

विष्णूचे प्राथमिक शिक्षण चिंचाळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे

Vishnu Tidake of Beed is the second in the PSI examination | बीडचा विष्णू तिडके पीएसआय परीक्षेत राज्यात दुसरा

बीडचा विष्णू तिडके पीएसआय परीक्षेत राज्यात दुसरा

googlenewsNext

बीड : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील विष्णू भगवान तिडके याने खुल्या प्रवर्गातून राज्यात दुसरा तर भज-ड मधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

विष्णूचे प्राथमिक शिक्षण चिंचाळा येथील जिल्हा परिषद, माध्यमिक अशोक माध्यमिक विद्यालय, उच्च वडवणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात झाले. त्यानंतर तो पुण्यात अभ्यासासाठी गेला. परिश्रम आणि जिद्द उराशी बाळगून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याने महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या यशाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. विष्णूचे आई-वडिल शेतकरी आहेत.

Web Title: Vishnu Tidake of Beed is the second in the PSI examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.