आष्टी ग्रामीण रुग्णालयास प्रीतम मुंडे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:08+5:302021-04-17T04:34:08+5:30
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड वाॅर्डची पाहणी करून व रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत माहिती घेतली. येथील ज्या कोणत्याही समस्या ...
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड वाॅर्डची पाहणी करून व रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत माहिती घेतली. येथील ज्या कोणत्याही समस्या असतील, त्या सोडविल्या जातील. कोविड लसीचा तुटवडा पडणार नाही, कोविड सेंटरमधील स्वच्छता व औषधांचा प्रश्न मार्गी लावू, रुग्णाला कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे खा.मुंडे असे सांगितले. प्रशासनाचे अधिकारी यांना समस्या सोडविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी अभयराजे भीमसेन धोंडे, तहसीलदार राजाभाऊ कदम, प्रदीप पांडुळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे, भाजप अ.ज.प्रदेश महामंत्री ॲड.वाल्मिक निकाळजे, जिल्हा भाजप सचिव शंकर देशमुख, भाजप तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, सरपंच राहुल काकडे, तुषार काळे, दादासाहेब जगताप व अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
===Photopath===
160421\img-20210416-wa0406_14.jpg