जम्बो कोविड सेंटरला वॉशिंग मशीन, मास्कची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:53+5:302021-04-18T04:32:53+5:30

तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमधील युनिट १ साठी पेशंट, वॉर्ड कर्मचारी इतर कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन ...

Visit of washing machine, mask to Jumbo Covid Center | जम्बो कोविड सेंटरला वॉशिंग मशीन, मास्कची भेट

जम्बो कोविड सेंटरला वॉशिंग मशीन, मास्कची भेट

Next

तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमधील युनिट १ साठी पेशंट, वॉर्ड कर्मचारी इतर कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन भेट व कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी गुजराती फाउंडेशनच्यावतीने उत्कृष्ट दर्जाच्या माक्सची भेट देण्यात आली.

कोविड युनिटसाठी देण्यात आलेली ही वॉशिंग मशीन ७ किलो वजनाची कपडे धुण्याच्या क्षमतेची आहे. कोविडच्या वाढत्या रुग्णांचा ताण व कपडे स्वच्छ धुलाईचा ताण या मशीनमुळे कमी होईल व पेशंटचे कपडे त्वरित स्वच्छ होऊन लगेच वापरात येतील, असे यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दगडु लोमटे यांनी मत व्यक्त केले. ही मशीन दगडू लोमटे, संतोष मोहिते, प्रवीण देशमुख, आनंद जाजू, सुनील सोळंके व स्वतः उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या आर्थिक सहाय्यातून कोविड सेंटर युनिट १ ला भेट दिली.

लोखंडी सावरगाव कोविड युनिट एक हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे वॉशिंग मशीन सुपूर्द करण्यात आली. यावेळी अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लोमटे, संतोष मोहिते व इतर हजर होते.

अशीच एक मशीन युनिट नं. २ साठी पण आवश्यक आहे. त्याचबरोबर झाडू, फरशी पुसण्याचे पोछे, पाण्याच्या बकेट, शौचालयात वापरासाठी छोट्या बकेट व मग, बेडशीट, सोलापुरी चादर व इतर साहित्याची गरज आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या लोखंडी सावरगाव कोविड युनिट १ व २ या ठिकाणी भेट द्याव्यात, अशी विनंती दगडु लोमटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. विशेषतः कोविडची लागण होऊन बरे झालेल्या पेंशट व त्यांच्या नातेवाइकांनी अशा भेटी द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.

===Photopath===

170421\fb_img_1618646882362_14.jpg

Web Title: Visit of washing machine, mask to Jumbo Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.