स्वाराती रुग्णालयाच्या रक्तपेढीस वॉटर कुलरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:55+5:302021-06-30T04:21:55+5:30
अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत असताना बँकेच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या ...
अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत असताना बँकेच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीस फिल्टरसह वाॅटर कुलर भेट म्हणून देण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत वाॅटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याहस्ते व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना रुग्णालयाच्या रक्तपेढीस फिल्टरसह वाॅटर कुलर भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी
अधीक्षक डॉ. राकेश जाधव, उपअधीक्षक डॉ. विश्वजित पवार, शरीरविकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरविंद बगाटे, शरीरविकृतीशास्त्र प्रा. डॉ. शिवाजी बिरारे,
प्रभारी अधिकारी रक्तकेंद्र डॉ. शीला गायकवाड,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश अब्दगिरे, सहायक प्राध्यापक रक्तकेंद्र डॉ. विनय नाळपे, सहायक प्राध्यापक डॉ. आरती बर्गे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुजित तुम्मोड, कनिष्ठ निवासी डाॅ. दत्ता चिकटकर, कनिष्ठ निवासी डाॅ. केदार कुटे, कनिष्ठ निवासी डाॅ. भाग्यश्री मुंढे, बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाशचंद सोळंकी आदींसह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डाॅ. विनय नाळपे यांनी केले. संचालन विजय रापतवार यांनी, तर उपस्थितांचे आभार संजय जड यांनी मानले.
===Photopath===
290621\avinash mudegaonkar_img-20210627-wa0048_14.jpg