कोविड लसींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:16+5:302021-05-01T04:32:16+5:30

शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी शिरूर कासार : नगरपंचायतकडून पाण्याबाबत निष्काळजीपणा, गढूळ व कुमट वास पाण्याला येत असून आरोग्यासाठी हे ...

Waiting for covid vaccines | कोविड लसींची प्रतीक्षा

कोविड लसींची प्रतीक्षा

Next

शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी

शिरूर कासार : नगरपंचायतकडून पाण्याबाबत निष्काळजीपणा, गढूळ व कुमट वास पाण्याला येत असून आरोग्यासाठी हे पाणी धोक्याची नांदी ठरत असल्याने विकत जार घ्यावे लागत आहे. नगरपंचायतने पाण्याबाबत काळजी घेऊन शहराला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील पाणपोई हरवल्या

शिरूर कासार : उन्हाळा सुरू झाला की शहरात ठिकठिकाणी थंड पाणी देण्यासाठी पाणपोई सुरू होत असत. याकामी तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश तांदळे अग्रेसर असायचे, त्यांनी संत आबादेव महाराज पाणपोईचा उपक्रम जवळपास दहा वर्ष सुरू ठेवला. मात्र, त्यांची बदली झाली. त्यांचे अनुकरण करत दुसरे देखील या कामात पुढाकार घेत होते. यावर्षी मात्र शहरातील पाणपोई हरवल्यागत झाले आहे.

कार्यालयातील गर्दीला लागली ओहोटी

शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कार्यालयात सतत वर्दळ असायची. तहसील, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, नगरपंचायत, अशा वेगवेगळ्या कार्यालयातील गर्दीला कोरोना आणि त्याच्या नियमावलीने ओहोटी लागल्याचे दिसून येते. त्यामुळे कामेही खोळंबत आहेत.

हळदी पाण्याकडे वाढता कल

शिरूर कासार : सध्या कोरोनाचा वाढता उद्रेक आणि दवाखान्यात पडत असलेली अपुरी बेड व्यवस्थेची जाणीव लक्षात घेता स्वत:ची प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी जुने घरगुती उपाय अंगीकारले जात आहे. त्यात हळद पाण्याकडे अधिक ओढा दिसून येतो. हळद ही प्रतिकारशक्तीवर्धक असल्याचे मानले जाते .घरच्या घरी असणारा हा उपाय आता चांगलाच पचनी पडला आहे.

उन्हाळी वाळवणात महिला गर्क

शिरूर कासार : उन्हाळा लागताच महिला प्राधान्य देतात ते वाळवण कामाला. त्यात ज्वारी बाजरीच्या पापड्या, कुरडई, पापड, बटाटा चिप्स, पापड्या आदी पदार्थ वर्षभरासाठी तयार करून ठेवतात शिवाय उन्हाळी वाळवण नातेवाईकांना देण्या-घेण्याची परंपरा सांभाळली जाते. यासाठी सध्या महिला या कामात गर्क असल्याचे दिसून येते.

Web Title: Waiting for covid vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.