शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:03 AM2019-07-09T00:03:42+5:302019-07-09T00:04:10+5:30
सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने मागणीचे प्रमाणही कमीच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी २ जुलैपर्यंत १२४ कोटी ७५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १३.१३ टक्के इतके आहे. पाऊस चांगला झाल्यास कर्ज मागणीसह वितरणाला गती येऊ शकते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, महाराष्टÑ ग्रामीण बॅँक आणि एसबीआयच्या वतीने कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या जास्त असलीतरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने मागणीचे प्रमाणही कमीच आहे.
बीड जिल्ह्याला यंदाच्या खरीप हंगाम (२०१९-२०) पीककर्जासाठी ९५० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून बॅँकर्स समितीच्या नियमित बैठक होत आहे. तर राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांसाठी पीककर्जासंदर्भात मेळावे घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. १ जूनपासून २ जुलैपर्यंत बीड जिल्ह्यातील राष्टÑीयीकृत , व्यावसायिक आणि सहकारी तसेच ग्रामीण अशा १७ बॅँकांच्या वतीने १२४ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. आलेल्या प्रस्तावानुसार बॅँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार कर्ज वाटपाची कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार शेतकरी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १७ हजार ६३ पात्र शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे.
एसबीआयला २९० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. २७४४ शेतक-यांना २६.६३ कोटी रुपयांचे पीक कर्ज या बॅँकेने वाटप केले आहे. तर महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेने ४३७५ शेतक-यांना ३१ कोटी १४ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बॅँकेला २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट् आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ६ हजार २९५ शेतक-यांना २६ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. बॅँक आॅफ बडोदाने ८८८ शेतक-यांना १० कोटी ३० लाखांचे कर्ज वाटप केले आहे. बॅँक आॅफ इंडियाने १०५ शेतकºयांना १.०३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. बॅँक आॅफ महाराष्टÑने ५३० शेतक-यांना ३ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बॅँकेने १०७७ शेतक-यांना ९ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एचडीएफसीने १४३ शेतक-यांना ४ कोटी २३ लाख तर आयसीआयसीआयने ५६८ शेतक-यांना ७ कोटी ५६ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. आयडीबीआयने ८८, अॅक्सिस बॅँकेने ३२, युनियन बॅँकेने ८३, युको बॅँकेने८५, सिडीकेट बॅँकेने १९, पंजाब नॅशनल बॅँकेने २२ आणि कॅनरा बॅँकेने ९ अशा ३३८ शेतक-यांना ४ कोटी १६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.
पावसाची अनिश्चितता : प्रक्रिया संथ
बीड जिल्ह्यातील १ लाख ८० हजार २२८ पात्र शेतक-यांना ८२८ कोटी ४८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे.मागील वर्ष दुष्काळाचे गेल्याने यंदा पीक कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता होती.
जवळपास २ हजार शेतक-यांकडे १ लाख ५० हजारापर्यंत थकबाकी आहे. या शेतकºयांना शासन नियमानुसार कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पूर्तता करण्याचे आवाहन बॅँकांकडून केले जाते मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
यंदा महिनाभर पावसाने हुलकावणी दिल्याने आता चांगल्या स्वरुपात पाऊस झाला तरच पीक कर्ज मागणी वाढू शकते.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे पीक कर्ज मागणी आणि वितरण प्रक्रिया संथ असल्याचे दिसून येत आहे.