गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, कधी साप आढळतात, कधी रानडुकरे धावतात, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत
By संजय तिपाले | Published: September 18, 2022 02:33 PM2022-09-18T14:33:56+5:302022-09-18T14:34:29+5:30
beed News: अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात.
बीड - अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात. तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील वस्त्यांवरील हे चित्र ग्रामीण विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट अद्यापही कशी बिकट आहे, हेच दर्शवते.
पिंपळवाडी हे डोंगरदऱ्रूात वसलेले गाव. शेतीकामे सुलभ व्हावीत म्हणून काही कुटुंबे शेतात स्थलांतरित झाली अन् पाहता- पाहता वेगवेगळ्या वस्त्या तयार झाल्या. बहिरवाल, खटाणे, चादर, सटवाई व तुपे या नावांनी ओळखल्या जाणाऱ्रूा वस्त्यांवर कुटुंबांची संख्या वाढत गेली. मात्र, या वस्त्या मूलभूत सोयींपासून दूरच राहिल्या. दळणवळणासाठी ना धड रस्ता आहे ना वाहनांची सुविधा. पावसाळ्यात वाहने उभी करुन पायी ये- जा केल्याखेरीज पर्याय नसतो. याचा फटका वृध्द, महिला, रुग्णांना तर बसतोच,पण विद्यार्थ्यांना रोजच कसरत करावी लागते. लोकवर्गणीतून २५ हजार रुपये गोळा करुन ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी केली आहे. जेसीबीद्वारे पाणी एका बाजूने काढून देत मुरुम टाकला, पण हक्काच्या रस्त्याची वस्तीवरील लोकांना प्रतीक्षाच आहे.
....
एक नदी अन् तीन ओढे
या पाच वस्त्यांपासून गावाचे अंतर अडीच किलोमीटर आहे. पाणंद रस्त्यातून ये- जा करावी लागते. वाटेत बिंदुसरा नदी व तीन ओढे लागतात. पावसाळ्यात त्यास पाणी आल्यावर दोन्ही काठांवर ताटकळ बसावे लागते.
....
स्वतंत्र शाळा सुरु करावी
पहिली ते दहावीपर्यंतची जवळपास ७५ मुले या वस्त्यांवरुन गावात शिक्षणासाठी ये- जा करतात. पाठवी दफ्तराचे ओझे घेऊन मुलांना चिखल तुडवत पाण्यातून वाट काढावी लागते. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने वस्तीवर जिल्हा परिषदेने स्वतंत्र शाळा सुरु करावी, अशी मागणी माजी सरपंच युवराज बहिरवाळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री संदीपान भुमरे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना भेटून कैफियत मांडली आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने पाऊले उचलावीत,असे ते म्हणाले.
....
विद्यार्थी म्हणतात...
शाळेत जाण्यासाठी घरातून दोन तास आधीच निघावे लागते, घरी पोहोचायलाही तेवढाच वेळ लागतो. शुज, चप्पल घालता येत नाही. त्यामुळे रोजच त्रास सहन करावा लागतो.
- पूजा बहिरवाळ, विद्यार्थिनी
...
पाण्यातून जपून पाऊले टाकावी लागतात. दगड, काटे टोचतात. कधी सापाची भीती असते, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ऊसाची शेती असल्याने रानडुकरांची दहशत असते.
- अंकिता बहिरवाळ, विद्यार्थिनी