धारूर घाटात कठडे कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:08+5:302021-02-23T04:51:08+5:30
धारूर : राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाटात दिवसेंदिवस कठडे कोसळत आहेत. अरुंद रस्ता, मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतींमुळे वाहनचालकांना जीव मुठीत ...
धारूर
: राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाटात दिवसेंदिवस कठडे कोसळत आहेत. अरुंद रस्ता, मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतींमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घाटातील संरक्षक भिंतींचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी सुहास शिनगारे , रामेश्वर खामकर यांनी केली आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील धारूर ते तेलगाव घाटातील रस्ता रुंदीकरण व संरक्षक भिंतीचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. फक्त डागडुजी करून काम भागविण्यात आले आहे. यामुळे घाटामध्ये वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाढते अपघात टाळण्यासाठी तसेच प्रवाशांना घाटातून सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन काम चालू करावे. घाटातील काही संरक्षक भिंतींची उंची रस्त्याएवढी झाली आहे. तर वळणाच्या काही ठिकाणी कठडे कोसळले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी अडचण येत आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन काम चालू करावे, अशी मागणी सुहास शिनगारे ,रामेश्वर खामकर तसेच किल्ले धारूर वाहन संघटना, प्रवाशांतून होत आहे.
धारूर येथील घाटात जागोगाजी रस्त्यालगतचे कठडे ढासळल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे संरक्षक कठडे बांधण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
220221\anil mhajan_img-20210222-wa0074_14.jpg~220221\anil mhajan_img-20210222-wa0073_14.jpg