माजलगावात भुरट्या चोरांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:41+5:302021-01-22T04:30:41+5:30
अवैध वाळूउपशावर नियंत्रणाची मागणी माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
अवैध वाळूउपशावर नियंत्रणाची मागणी
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. यावर कारवाईची मागणी होत आहे.
पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागांंतील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड होते. दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. कबाडगल्ली, बुंदेलपुरा, जव्हेरीगल्ली, मोमीनपुरा भागामध्ये काही पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी होत आहे.
अवैध प्रवासी
वाहतूक बोकाळली
बीड : शहरातील साठे चौक, नगरनाका, बार्शीनाका, मोंढा रोड भागात सध्या खाजगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.