७ राज्यांतील ‘वॉन्टेड’ गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:20 AM2019-03-25T00:20:07+5:302019-03-25T00:23:11+5:30

सात राज्यांत गुन्हेगारी करून सहा वर्षांपासून फरार असलेला वॉन्टेड गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

The 'wanted' criminals in 7 states, bead police | ७ राज्यांतील ‘वॉन्टेड’ गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात

७ राज्यांतील ‘वॉन्टेड’ गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देसहा वर्षांपासून होता फरार : पोलिसांना गुंगारा देत करायचा गुन्हेगारी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड/परळी : सात राज्यांत गुन्हेगारी करून सहा वर्षांपासून फरार असलेला वॉन्टेड गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रविवारी दुपारी त्याच्या परळी शहरातील इराणी गल्लीत विशेष आॅपरेशन राबवून मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांना गुंगारा देत तो गुन्हेगारी करीत असे. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात बीड पोलिसांना यश आले.
जहीर अब्बास शेकू अली (३२ रा.इराणी कॉलनी शिवाजीनगर, परळी) असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. जहीरबरोबरच त्याचा लहान भाऊ लाला यालाही बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश व दिल्ली येथे त्याने अनेक गुन्हे केले होते. मारामारी, लुटमार, धमकावणे, फसवणूक, लुबाडणे, चैन स्नॅचिंग, मारामारी करणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या सातही राज्यातील पोलिसांना जहीर हवा होता. रविवारी तो परळीत आल्याची माहिती मिळाली. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी यासाठी विशेष कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे इराणी कॉलनीत फौजफाट्यासह सापळा लावला.
पोलीस आल्याचे समजताच जहीर मागच्या गल्लीतून पळाला. मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. सपोनि श्रीकांत डोंगरे व पथकाने अर्धा किमी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याला परळी ठाण्यात बंदोबस्तात आणण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बाळासाहेब पाटील, सपोनि श्रीकांत डोंगरे, सलीम पठाण, रमेश सिरसाठ, मधुकर निर्मळ, व्यंकट भताने, रंगा राठोड, सविता दहीवाळ, दत्ता गित्ते, लाला बडे, सचिन सानप, गोविंद फड, अडेकर, मुंडे, भांगे आदींनी केली.
पोलिसांना पाहून महिलांचा आरडाओरडा
४परळीतील इराणी गल्लीत चार दोन पोलिसांनी जाणे अशक्य आहे. येथे ‘एन्ट्री’ करताना मोठा फौजफाटा सोबत घ्यावा लागतो. रविवारीही जहीरला पकडण्यासाठी पोलीस गल्लीत गेल्यावर महिलांनी त्यांना गराडा घालत आरडाओरडा सुरू केला. हे ऐकून जहीर पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
ठकबाजी करण्यात तरबेज
४तोतया पोलीस, दागिने उजळून देणे, हातचालाकी करून दागिने व पैसे लंपास करण्यात जहीर तरबेज होता. त्याने असे अनेक गुन्हे केलेले आहेत. त्याच्याकडून राज्यातील ठकबाजीची अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: The 'wanted' criminals in 7 states, bead police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.