कोविडसंदर्भात आष्टी तहसीलमध्ये वॉर रूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:18+5:302021-04-15T04:31:18+5:30

आष्टी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक तत्काळ मदत मिळण्यासाठी (०२४४१) २९५०७३ व २९५५४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील ...

War room in Ashti tehsil regarding Kovid | कोविडसंदर्भात आष्टी तहसीलमध्ये वॉर रूम

कोविडसंदर्भात आष्टी तहसीलमध्ये वॉर रूम

Next

आष्टी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक तत्काळ मदत मिळण्यासाठी (०२४४१) २९५०७३ व २९५५४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र राऊत यांच्या आदेशाने मंगळवारपासून तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्तीसाठी वॉररूमची स्थापना करण्यात आली आहे. या वॉररूममधून तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी तसेच कोविड रुग्णालयात येणाऱ्या अडचणींची नोंद घेतली जाणार आहे. गावात एखादा कोरोनाबाधित व्यक्ती फिरत असेल तर त्याची माहिती तहसील कार्यालयाच्या या वॉर रूमला कळविली तर एक तासात संबंधित यंत्रणेद्वारे त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. यासाठी ही सेवा २४ तास सुरू राहणार असून, यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचेही तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सांगितले.

चौकट

जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने तहसील कार्यालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने मंगळवारपासून वॉर रूम सुरू केले असून, ०२४४१-२९५०७३ व २९५५४२ या क्रमांकावर आपली अडचण सांगून यावर संबंधित विभागाला कळवून एक तासाच्या आत सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला जाईल.

-राजाभाऊ कदम, तहसीलदार, आष्टी.

===Photopath===

140421\img-20210414-wa0384_14.jpg

Web Title: War room in Ashti tehsil regarding Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.