दुरुस्तीकामांसाठी स्मशानभूमीत उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:37+5:302021-05-17T04:32:37+5:30
सध्या कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. या कठीण काळात ईतर आजार किंवा वृध्दपकाळाने ...
सध्या कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. या कठीण काळात ईतर आजार किंवा वृध्दपकाळाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्काराला जवळचे पाच- दहा लोकच उपस्थित असतात. या परिस्थितीत बीड येथील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीतील लोखंडी संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाल्याने मयतांवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या जागेवर उभारलेले लोखंडाचे संरक्षक कठडे सुव्यवस्थित असताना चार क्विंटल लाकूड लागत असे. लोखंडी कठडे तुटल्याने आता ७ क्विंटल लाकूड लागत आहे. कठडे नसल्यामुळे चिता जळत असताना लाकडे ढासळत आहेत. यामुळे अगोदरच दु:खात असलेल्या मयतांच्या नातेवाईकांना वेदना असह्य होतात. मयतांच्या नातेवाईकांना होत असलेल्या मानसिक त्रासाची दखल घेऊन बीड नगर परिषदेने आठ दिवसात अमरधाम स्मशानभूमीतील लोखंडी संरक्षक कठड्यांची दुरूस्ती करावी. २५ मेपर्यंत बीड नगर परिषदेने दुरूस्ती केली नाही तर अमरधाम स्मशानभूमीत उपोषण करू असा ईशारा भाजपचे नेते भगीरथ बियाणी यांनी दिला आहे.
===Photopath===
160521\16_2_bed_15_16052021_14.jpeg
===Caption===
दुरुस्तीकामांसाठी स्मशानभूमीत उपोषणाचा इशारा