पाणीपातळी घटू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:00+5:302021-05-11T04:36:00+5:30
रस्त्याची दुरवस्था बीड : शहरातील विविध ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे रस्त्याची ...
रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील विविध ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही होत आहे. यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
शेतकरी मशागतीत व्यस्त
बीड : तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती वाढत असल्याने शेतात राहणे शेतकरी पसंत करीत आहेत.
सफरचंदाचे भाव वधारले
बीड : सफरचंदाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने सफरचंदाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १०० रुपये किलोने विकले जाणारे सफरचंद आता १४० ते १६० रुपये किलोने विकले जात आहेत.
रस्त्यांची दुर्दशा
बीड : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वर्षभरापूर्वी अनेक ठिकाणचे रस्ते तयार करण्यात आले होते. मोठ्या पावसामुळे व काम करतांना रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने खड्डे पडले आहेत.