पाणीपातळी खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:45+5:302021-05-04T04:14:45+5:30
.... गादी व्यावसायिक अडचणीत अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, ...
....
गादी व्यावसायिक अडचणीत
अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहेही ओस पडली आहेत. परिणामी गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या व्यावसायिकांना कुटुंब चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी केली आहे.
....
धूम्रपानामुळे आजार
अंबाजोगाई : आहाराच्या बदलत्या सवयी, अमलीपदार्थांचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील बदलामुळे खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. धूम्रपानावर बंदी असतानाही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या प्रकारावर निर्बंध घालाो, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहिते यांनी केली आहे.
....
कर्जवसुली थांबवा
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचतगटांना बँकांनी दिलेल्या कर्जाची वसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश गोस्वामी यांनी केली आहे.
...
ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची दैना
अंबाजोगाई : शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश दहातोंडे यांनी केली आहे.