छत्रपती नगरचा पाणीप्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:43+5:302021-05-04T04:14:43+5:30
माजलगाव : शहरालगत असलेल्या बायपास रोडवरील छत्रपती नगरमध्ये स्थापनेपासून पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास ...
माजलगाव : शहरालगत असलेल्या बायपास रोडवरील छत्रपती नगरमध्ये स्थापनेपासून पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत नगराध्यक्ष शेख मंजूर, उपनगराध्यक्ष सुमनबाई मुंडे, पाणीपुरवठा सभापती व या भागाचे नगरसेवक शरद यादव यांनी या कामी लक्ष घातले. यासाठी आवश्यक नियोजन करून पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. या कामाला नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या उपस्थितीत रविवारी सुरूवात झाली. तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी नगरसेवक भागवतराव भोसले, डॉ. भगवानराव सरवदे, सर्जेराव काशीद, माणिकराव डावकर, आढाव सर, गणेश ढिसले, दिवाकर डासाळकर, उत्तरेश्वर आनेराव, गावडे पवार, नाईकवाडे चाळक यांच्यासह प्रभागातील नागरिक व पाणीपुरवठा अभियंता जाधवर, कर्मचारी वामन काजळे, माऊली देशमुख, कुमार जावळे उपस्थित होते.
===Photopath===
030521\purusttam karva_img-20210503-wa0015_14.jpg