वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यात सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:11+5:302021-04-21T04:33:11+5:30
आष्टी तालुक्यात वनविभाकडून वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, पाण्याच्या शोधात फिरताना जीव जाऊ नये यासाठी दहा ठिकाणी पाणवठे तयार ...
आष्टी तालुक्यात वनविभाकडून वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, पाण्याच्या शोधात फिरताना जीव जाऊ नये यासाठी दहा ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. यात टँकरच्या माध्यमातून पंधरा दिवसाला पाणी सोडून मुक्या जीवांची तहान भागविली जात आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरताना मरतात. त्यामुळे वेळीच जंगलातील ठिकाणी तयार केलेल्या पाणवठ्यात मुबलक पाणी सोडण्यात आले आहे. हीच व्यवस्था कायम ठेवून वन्यजीवांची संख्या कमी होणार नाही, त्यांचा जीव जाणार नाही याची काळजी वनविभागाने घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.
याबाबत आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांना विचारले असता ते म्हणाले की, तालुक्यात दहा पाणवठे असून सगळ्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले आहे. कुठे गरज भासली तर वनविभागाला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
===Photopath===
200421\nitin kmble_img-20210420-wa0036_14.jpg