सलग तिसऱ्या दिवशी सिंदफणेच्या पुलावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:08+5:302021-09-08T04:40:08+5:30
पाडळीत थंडी-तापाचा उद्रेक शिरूर कासार : तालुक्यात कोरोना नियंत्रणात आला असला तरी पाडळी परिसरात बदलत्या हवामानामुळे थंडी-तापाचा ...
पाडळीत थंडी-तापाचा उद्रेक
शिरूर कासार : तालुक्यात कोरोना नियंत्रणात आला असला तरी पाडळी परिसरात बदलत्या हवामानामुळे थंडी-तापाचा उद्रेक सुरू झाला असून गरजू रुग्ण खासगी दवाखान्यांचा आधार घेत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांनी सांगितले. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनाही त्यांनी कळविले आहे. यावर आरोग्य विभाग तातडीने दखल घेईल असे सांगून ग्रामपंचायतीने डास निर्मूलनासाठी औषध फवारणी करून घेण्याबाबत सुचविले आहे.
पावसाची रिपरिप सुरूच
शिरूर कासार : तालुक्यात काही दिवसांपासून अवर्षणजन्य परिस्थिती होती. मात्र, शनिवारी झालेल्या पावसाने चित्रच बदलून टाकले असून तालुकाच जलमय झाला. दोन दिवसांच्या जोरदार पावसानंतर तिसऱ्या दिवशीदेखील पावसाची रिपरिप चालूच असल्याने पिकांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूर परिस्थितीवर प्रशासनाची नजर
शिरूरकासार : तालुक्यात अतिवृष्टी होऊन नद्यांना मोठा पूर येत आहे. छोटे तलाव तर भरलेच; परंतु मोठे प्रकल्पदेखील ओसांडून वाहू लागले. अशा परिस्थितीत नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तहसीलदार श्रीराम बेंडे हे सतत सिंदफना नदीसह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या गावांच्या संपर्कात असून त्या त्या गावातील तलाठी ,ग्रामसेवकांना सतर्क राहण्याच्या सक्त सूचना देत वेळोवेळी त्यांच्याकडून माहिती घेत आहेत.
मंगळवार ठरला पावसाचा लाॅकडाऊन दिवस
शिरूर कासार : सोमवारी पोळ्याचा सण असल्याने शहरात मोठी वर्दळ होती. खरेदीसाठी झुंबड दिसत होती. मात्र, पोळा संपला आणि मंगळवारी सकाळपासून पावसाने संततधार सुरू ठेवल्याने अघोषित लाॅकडाऊनचे चित्र दिसून येत होते. रस्त्यावर तुरळक रहदारी दिसत होती.