गेवराईतील पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:25+5:302021-05-01T04:32:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे गेवराईकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गेवराई शहरातील पाणीपुरवठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे गेवराईकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गेवराई शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा. ..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीम फारोकी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
गेवराई शहरातील तय्यबनगर, संतोषनगर, साठेनगर, इस्लामपुरा, मोमीनपुरा, कोरबू गल्ली यासह शहरातील विविध भागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. रमजानचा महिना सुरु असल्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरपरिषदेतील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ, शेख समद, सय्यद अनिस, सय्यद वसीम, शेख अल्ताफ, शेख सलीम, शेख सोहेल, इरफान शेख, शेख हमीद, अलिम पठाण, अमेर पठाण, रफिक शेख, मोसीन शेख, अफरोज पठाण, समीर सय्यद, युसूफ शेख, अझीम मणियार, बशीर मामू शेख, रशीद भाई, अवेज पठाण, समद भाई, राईस मणियार, आक्तर भाई, इसाक मणियार, अफरोज पठाण, सय्यद खदिर, लतीफ बागवान, सत्तार पठाण, हमीदभाई, राजू मिरपगार, रामा निकम, राधा किसन, अरुण धापसे, इम्रान अत्तार, इम्रान पठाण आदींच्या सह्या आहेत.
===Photopath===
300421\img-20210430-wa0239_14.jpg