ऐन पावसाळ््यात जिल्हाभरात ७४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:38 AM2019-09-20T00:38:21+5:302019-09-20T00:38:51+5:30
भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात भर पावसाळ््यात ७४३ टँकर सुरु आहेत. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून, अजून तहान भागवण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पावसाळा सुरु असून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मुंबईमध्ये धुव्वाँदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. मात्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून, बीड जिल्ह्यात देखील पावसाने दडी मारलेली आहे. अजूनही नद्या-नाले कोरडे असून शेतातून पाणी वाहवले नाही. ग्रामीण भागातील हातपंप, विहिरींना पाण्याचा थेंब देखील आलेला नाही. पाणी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकरवर अवलंबून राहवे लागत आहे.
जिल्ह्यातील बहूतांश सर्वच प्रकल्प मृत साठ्यात आहेत. त्यामुळे टँकरला देखील पाणी दूरच्या ठिकाणावरून आणावे लागत आहे. अनेक गावांमध्ये दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. दरम्यान ७४३ टँकर सुरु असून, ही संख्या येत्या काळात पाऊस चांगला झाला नाही तर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ज्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी प्रशासनाकडून स्थळपाहणी करुन टँकरी मुदत वाढ देत आहे.