२०१८ च्या लोकसंख्येआधारे टॅँकरने पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:11 AM2019-05-10T00:11:36+5:302019-05-10T00:13:00+5:30
पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बीड : पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गुरुवारी वर्षा निवासस्थानातून आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी दुष्काळी उपाययोजने संदर्भात संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी-रोहयोची कामे, तातडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसून अधिकाऱ्यांनी विविध आवश्यक कामांना तातडीने मंजुरी द्यावी. अशा कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही ते म्हणाले. या बैठकीला मुख्य सचिव यु. पी. एस. मदान,पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
४ लाख १८ हजार जनावरे
जिल्ह्यात एकूण ८५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात ९ नळपाणी पुरवठा योजनांची दुरु स्ती, ११ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व ९०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची ९७.९९ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम भरण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ११ तालुक्यात ६०० शासकीय चारा छावण्या सुरु आहेत. त्यामध्ये ३ लाख ८७ हजार ६१६ मोठी तर ३१ हजार २११ लहान अशी एकूण ४ लाख १८ हजार ८२७ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व ११ तालुक्यातील दुष्काळग्रस्त १४०२ गावातील ७ लाख ८४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४२८.३९ कोटी रु पयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरपंचांनी मांडल्या अडचणी
बीड जिल्ह्यातील अर्जुन शेंडगे, हरिभाऊ पवार, परमेश्वर राठोड, श्रीराम काकडे, तानाजी खामकर, संजय थोट, मनोहर खोमणे, जयसिंग नरवडे, विश्वनाथ घुले, उत्तम फड, भाऊसाहेब अवताडे,भगवान चोरमले तसेच वंदना काटे, रेश्मा तोडकर, संगीता पाटील, छाया कवाडे, प्रियंका काशीद, दिपा शिरसाठ, किर्ती चव्हाण, पल्लवी भुते, तारामती माने, सखुबाई सोनवणे,सुनीता जायभाय, सरीता सानप या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करुन आपल्या अडचणी मांडल्या.
तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा
गावासाठी जादा पाणी टँकर सुरु करणे,नव्याने टँकर सुरु करणे,विहिरींची दुरु स्ती करणे,पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करणे, तलाव दुरु स्ती, नव्याने चारा छावण्या सुरु करणे,चारा छावण्यांची संख्या वाढविणे,रोहयोची कामे सुरु करणे, रोहयो कामाचे पैसे देणे, नळ पाणी पुरवठा योजनेच्या किरकोळ दुरु स्तींना तातडीने मंजुरी देणे अशा अनेक मागण्या यावेळी सरपंचांनी केल्या. या तक्र ारींवर तातडीने कार्यवाही करु न अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.