कोविड स्मशानभूमीत बसविली पाण्याची टाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:36+5:302021-04-30T04:42:36+5:30

अंबाजोगाई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय दूर करण्यासाठी व त्यांना पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी अंबाजोगाई येथे शिक्षक ...

Water tank installed in Kovid Cemetery | कोविड स्मशानभूमीत बसविली पाण्याची टाकी

कोविड स्मशानभूमीत बसविली पाण्याची टाकी

Next

अंबाजोगाई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय दूर करण्यासाठी व त्यांना पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी अंबाजोगाई येथे शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने त्या परिसरात ओट्याचे बांधकाम करून पाण्याची टाकी बसविण्यात आली.

अंबाजोगाई शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहेत. यात जवळपास दररोज ८ ते १० मृत्यू होत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंबाजोगाई शहराबाहेरील सर्व्हे नंबर १७ मध्ये आरक्षित असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात. येथे कुठल्याही बाबीसाठी पाण्याची सोय उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक मैत्री प्रतिष्ठान, अंबाजोगाईच्या वतीने सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेने या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये ५०० लिटर पाण्याची क्षमता असलेली पाण्याची टाकी ओट्याचे बांधकाम करून बसविण्यात आली आहे. या उपक्रमात शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांच्यासह सदस्यांनी पुढाकार घेतला.

===Photopath===

290421\fb_img_1619632089007_14.jpg

Web Title: Water tank installed in Kovid Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.